loader
Breaking News
Breaking News
Foto

हरहुन्नरी व्यक्तीमत्व दिपक बेर्डे यांचे अपघाती निधन

देवरूख प्रतिनिधी :देवडे गावचे सुपुत्र हरहुन्नरी व्यक्तीमत्व व परीवहन मंत्री सरनाईक यांचे कार्यालयीन अधिकारी दिपक बेर्डे याचे अपघातात दुखःद निधन झाले. दीपक हे काल साखरपा येथून आपल्या नातलगाच्या विवाह सोहळ्यासाठी मोटार सायकलने लांजा तालुक्यात जात असताना भांबेड येथे अपघात होवून डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना त्वरित रत्नागिरी येथे सिव्हील हाँस्पिटला दाखल करण्यात आले होते. त्यांचे उपचारा दरम्यान आज दुखःद निधन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवडे पंचक्रोशीतील विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यासाठी त्यांची धडपड असायची. अनेक आमदारांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले होते. सद्या ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात काम पहात होते. त्यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त समजताच साखरपा व देवड पंचक्रोशीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे त्यांचेवर आज देवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत..

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg