loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण नगरपालिका निवडणूक आम्ही जिंकू - वैभव नाईक

मालवण (प्रतिनिधी) - मालवण नगरपालिका निवडणूक लढाविणारे उबाठा शिवसेनेने सर्व उमेदवार हे सामान्य कुटुंबातील आणि सामान्य जनतेसाठी काम करणारे तसेच भ्रष्टाचार विरहित असे उमेदवार दिले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी देखील अनुभवी चेहरा असावा, दुसऱ्यांच्या कलेने चालणारा उमेदवार नसावा, असे जनतेमधूनच मत होते. म्हणूनच आम्ही पूजा करलकर यांना नगराध्यक्ष उमेदवारी दिली आहे, मालवण नगरपालिका निवडणूक आम्ही जिंकू असा ठाम विश्वास मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी येथे बोलताना व्यक्त केला हा विश्वास व्यक्त करतानाच नाईक यांनी गेल्या वर्ष - दीड वर्षात सत्ताधाऱ्यांनी काय आणले? असा सवाल करीत त्यानी सत्ताधाऱ्यांनी जो विकास केला त्याचे एक उदाहरणं द्यायचे झाल्यास खड्डेमय बनलेला कुडाळ-मालवण हाच रस्ता सत्ताधाऱ्यांच्या विकासाबद्दल सारे काही सांगून जातो असा टोला लगावला माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेसमोर शक्तीप्रदर्शन करीत पूजा करलकर यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तसेच उर्वरित नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांचे अर्जही दाखल करण्यात आले. त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या समवेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर शहर प्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके आणि ठाकरे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, या निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासह जे उमेदवार देण्यात आले आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ते एका तत्त्वाशी ठाम राहिलेले उमेदवार आहेत. एका तत्त्वाशी ठाम राहिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी शहरवासीयांनी उभे राहावे. ते तुम्हाला विश्वास देतील, पुढील पाच वर्षे मालवण नगरपालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने पार पाडतील. काही लोक राज्यात सत्ता असल्याने मालवण नगरपालिका ताब्यात देण्याची मागणी करत आहेत. परंतु, मालवण नगरपालिकेत आजही १०० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. हा निधी प्रामाणिकपणे खर्च केल्यास मालवण शहराचा निश्चितच कायापालट होईल, असे नाईक म्हणाले. आजपर्यंत शहरात जी काही कामे झाली आहेत, यात नगर पालिकेची इमारत, नळपाणी योजना, बस स्टँड ही सर्व कामे मी आमदार असताना सत्ता काळात झाली आहेत. परंतु गेल्या वर्ष - दीड वर्षात वर्षात सत्ताधाऱ्यांनी काय आणले, हा प्रश्न सर्वांनी विचारला पाहिजे. विकासाच्या बाबतीत बोलायचे झाले तर कुडाळ-मालवण हाच रस्ता विकासाबद्दल सर्व काही सांगून जातो. शहरातील खड्डेमय रस्ते हाच विकास सांगून जातोय. शहराच्या नळपाणी योजनेचे काम वर्क ऑर्डर होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला तरी अद्याप सुरू झालेले नाही. भुयारी गटार योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी आणूनही ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. सत्ताधाऱ्यांचे नाकर्तेपणाचे उदाहरण द्यायचे झाल्यास, मालवण नगरपालिकेला एक वर्ष मुख्याधिकारीच नाही अशी टीका नाईक यांनी केली.

टाइम्स स्पेशल

मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी जो चेहरा हवा तो अनुभवी असायला हवा, दुसऱ्याच्या कलेने चालणारा नको, असे जनतेचे मत होते. शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पूजा करलकर यांना देण्यात आली. करलकर यांना कोणी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. कारण त्यांनी स्वतः नगरसेविका म्हणून अनेक वर्षे चांगले काम केले आहे. त्या कोणताही डाग नसलेल्या उमेदवार असून सर्व लोकांना विश्वासात घेऊनच नगरपालिकेचा कारभार हाकतील. मालवण नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्षसह नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आल्यास जिल्हा नियोजन नगरपालिकेचा फंड आणि पडून असलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून आमचे प्रामाणिक उमेदवार शहराचा कायापालट निश्चितच चांगल्या पद्धतीने करतील. जाती-धर्म-पक्ष भेद विसरून आमचे उमेदवार काम करतील तसेच नगरपालिकेच्या कारभारावर शहरवासीयांचाही अंकुश राहील," असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg