loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेत प्रभाकर कोळेकर प्रथम

खेड (प्रतिनिधी)- शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष 2025/26 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र,पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच डायटचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धातंर्गत तालुकास्तरावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन खेड नं.१ या शाळेत करण्यात आले होते. या स्पर्धेत कशेडी गावणकरवाडी या शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर योग्य की अयोग्य? या विषयावर आपले मत अतिशय समर्पकपणे मांडले. तसेच त्यांनी इतर स्पर्धकांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य तो प्रतिसाद देऊन आपले मत उत्तम पद्धतीने पटवून दिले. प्रभाकर कोळेकर यांची जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्यांच्या स्पर्धेतील या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg