loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत शिवसैनिकांचे शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

दापोली (प्रतिनिधी) - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर २०२५ रोजी 13 वा स्मृतिदिन होता. या शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती दिनानिमित्त दापोली तालूका शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोली शहर प्रमुख संदिप चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवसेना प्रमुखांना शिवसैनिकांतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका मानसी विचारे, प्रसाद ऊर्फ दादा कळसकर, विभाग प्रमुख रमेश बहीरमकर, उप विभाग प्रमुख वामन खडपकर, शहर समन्वयक प्रदीप गमरे, संदिप पावसकर आदींसह ग्रामस्थ तसेच शिवसैनिक उपस्थित होते. आदरांजली वाहण्यात आल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख संदीप चव्हाण त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका मानसी विचारे यांनी शिवसेना प्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी वातावरणात पूर्णतः भावूक झाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg