loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत आधार केंद्रावर आधार अपडेट आणि मोबाईल लिंक करण्यासाठी होतेय गर्दी

दापोली (प्रतिनिधी) - शासनाच्या विविध शासनाकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आपल्या मोबाईलशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांरे दापोली शहरातील आधार केंद्रावर आधार केंद्र सुरू होण्याआधीच सकाळी सकाळीच आधार कार्ड अपडेट आणि आधारकार्ड शी मोबाईल लिंक करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. शाळेपासून ते बँकेपर्यंत अनेक ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो. त्यामुळे आधार कार्डशी आपला मोबाइल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. सरकारने आधार कार्डला अन्य कागदपत्रं आणि बँक अकाउंटशी जोडणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक असणे तसेच आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे .शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर आधार कार्ड अपडेट आणि आधारकाडला आपला मोबाईल लिंक असल्याशिवाय आपल्याला शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तसेच आधार कार्डला मोबाईल लिंक करण्यासाठी दापोली तालूका मुख्यालयाच्या ठिकाणी दापोली शहरात विविध ठिकाणी असलेल्या आधार केंद्रावर मोठीच गर्दी होताना दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोलीत शहरात ४ तर एक दाभोळ येथे अशी एकूण ५ आधार केंद्र आहेत. परतीच्या पावसामुळे शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले होते.त्या नुकसानीचे पंचनामे झाले असून शेतकरी लाभार्थ्यांना नियमानुसार व शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू झाले आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या थेट बॅक खात्यात नुकसानीचे अनुदान जमा करण्यात येत आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा हप्ता देखील जमा करण्यात येत असून लाडकी बहिण योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून गावागावातून लाभार्थी महिला वर्ग आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तसेच मोबाईल लिंक करण्यासाठी आधार केंद्रावर गर्दी करत आहेत.

टाइम्स स्पेशल

दापोली तहसील कार्यालया ठिकाणी असलेल्या आधार केंद्रावर प्रतिदिन ३५ मोबाईल धारकांचे मोबाईल आधार केंद्राशी लिंक करण्यात येत असले तरी सामाजिक भावनेच्या दृष्टीकोनातून येथे दुर दुर वरुन आलेल्यांना मदत केली जात असल्याची समाधानाची बाब असली तरी गर्दी काही कमी होण्याचे नाव नाही. शासकीय योजनांचा लाभ मिळणमाझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा न चुकता सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना त्यांचे ई-केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र ते केले जात नसल्याने अचानकपणे आधार केंद्रावर अशा लाभार्थ्यांसह अन्य लाभार्थ्यांची गर्दी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg