loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवाभावी भारतीय संस्थेद्वारे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन

सावंतवाडी : सेवाभावी भारतीय संस्था सावंतवाडी तर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवाी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले.सदर स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटात घेण्यात आली.राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कमलाकर ठाकूर (केंद्रप्रमुख सावंतवाडी), श्रीम. अनुजा साळगांवकर (मुख्याध्यापिका मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रत्यक्ष स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून बहुसंख्य शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील विविध शाळांमधून इयत्ता पाचवी ते सातवी या गटात एकूण 24 विद्यार्थी सहभागी झाले तर आठवी ते दहावी या गटात एकूण 23 विद्यार्थी सहभागी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाचवी ते सातवी या गटात कु. आराध्या आप्पा सावंत (शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर) हिने प्रथम क्रमांक तर कु.सर्वेक्षा नितीन ढेकळे(यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी) हिने द्वितीय क्रमांक तसेच कु.यश प्रवीण सावंत (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी) याने तृतीय क्रमांक पटकावला.इयत्ता आठवी ते दहावी या गटात कु.गायत्री शशिकांत सावंत (श्री. भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव) हिने प्रथम क्रमांक तर कु.मृदुला नाना सावंत (दिव्यज्योती स्कूल डेगवे, बांदा) हिने द्वितीय क्रमांक तसेच कु.मैथिली मनोहर सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली) हिने तृतीय क्रमांक पटकावला . स्पर्धेचे परीक्षण प्रा. माणिक बर्गे, प्रा. कविता तळेकर, प्रा. सुप्रिया केसरकर व प्रा. मिलिंद कासार यांनी केले. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम ,प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्र व छोटीशी भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या गायनाने झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सदस्या श्रीम.वेदिका सावंत यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीम.श्रृती जोशी व श्री. गोविंद प्रभू यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेवाभावी भारतीय संस्थेच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg