loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूल खेडमध्ये विज्ञान व गणित प्रदर्शन उत्साहात

खेड - प्रतिनिधी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये विज्ञान व गणित प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सदरच्या विज्ञान व गणित प्रदर्शनाची मंगलमय सुरुवात प्रमुख मान्यवर लक्ष्मी ऑर्गानिक इंडस्ट्रीज लिमिटेड, लोटेचे सिनियर व्हॉइस प्रेसिडेंट आणि साईट हेड दीपक श्यामजी पाटील, सुयोग इन्फ्रास्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम जोशी, घरडा केमिकल कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर दयानंद गायकवाड, डॉ. समीर मंडपे, डॉ. शितल मोरे, संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभहस्ते दीप प्रज्ज्वलन, सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून व फीत कापून करण्यात आली. तद्नंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे व शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान’ या नाटिकेचे सादरीकरण केले. सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर लक्ष्मी ऑर्गानिक इंडस्ट्रीज लिमिटेड, लोटेचे सिनियर व्हॉइस प्रेसिडेंट आणि साईट हेड दीपक श्यामजी पाटील यांनी विज्ञान व गणित प्रदर्शनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आपल्या दैनंदिन जीवनातील गणित व विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. शाळेतील विद्यार्थ्यांचे भव्य विज्ञान व गणित प्रदर्शन पाहून मी भारावून गेलो असल्याचे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेतील सजावट तसेच विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या प्रात्यक्षिकांमधून दिसत होती. शैक्षणिक क्षेत्रामध्ये रोटरी शाळेचे नाव आज सर्व दूर पसरले आहे. रोटरी शाळा ही इतर शाळांपेक्षा आगळीवेगळी असल्यामुळेच आज शिक्षणाबरोबरच क्रीडा, संगीत, कला या सर्वच क्षेत्रात अग्रगण्य असल्याचे दिसून येते. तुम्ही रोटरी शाळेत शिकत आहात, हे तुमचे भाग्यच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यातील आपले ध्येय निश्चित करून उज्ज्वल यशाकडे वाटचाल करावी असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या विज्ञान व गणित प्रदर्शनाची तयारी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेऊन स्वतः विज्ञान व गणिताचे वेगवेगळे प्रयोग सिद्ध केले. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात विज्ञान व गणित विषयाशी निगडीत ’टाकाऊतून टिकाऊ’ वस्तू तसेच वीजनिर्मिती, प्रदूषणावर उपाय सुचवणारी यांत्रिक उपकरणे, किडणीचे कार्य, प्रकाश परावर्तनाचे नियम, सांख्यिकी व भौमितिक रचना, पाढे तयार करण्याच्या आधुनिक पद्धती, आदर्श घर, आरोग्य तपासणी यंत्र, औषधी वनस्पतींचे उपयोग, मानवी मेंदूची आंतर्बाह्य रचना, फुलांचे विविध उपयोग, पाण्याचा योग्य निचरा, शरीरास अपायकारक ठरणारे शीतपेय, वाहनाच्या रहदारीतून विद्युत निर्मिती, अपघात सुचक यंत्र, वजनी काटे, कालमापन पद्धती, पायथागोरस सिद्धांत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावर आधारित विविध प्रतिकृती, मातीची प्रतवारी, शेतीची आवश्यकता, गणितीय क्लृप्त्या, वैदिक गणित, प्रकाशाच्या शलाका यांसारख्या विषयांवर आधारित तयार केलेली उपकरणे लक्षवेधी ठरली.

टाईम्स स्पेशल

विज्ञान व गणित प्रदर्शनात प्रत्येक गटाने माहितीपत्रक सुवाच्छ अक्षरात लिहिले होते व त्याबद्दलची माहिती सांगून उपस्थित मान्यवर व परीक्षकांची मने जिंकली. तसेच सर्व पालकांनी या आगळ्यावेगळ्या विज्ञान व गणित प्रदर्शनाला हजेरी लावून विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या तज्ज्ञ पालकांनी विज्ञान व गणित प्रदर्शनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन परीक्षण व मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. सदरच्या विज्ञान व गणित प्रदर्शनासाठी शाळेतील विज्ञान व गणित विषय शिक्षकांबरोबरच सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित प्रमुख मान्यवर व परीक्षक यांना आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवा पाटणकर, सृष्टी राणे, अनन्या क्षीरसागर व शिवम शिखले या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विज्ञान व गणित प्रदर्शनाच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg