loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात उबाठा शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन; नगराध्यक्ष पदासाठी पूजा करलकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मालवण (प्रतिनिधी) - मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी आज उबाठा शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत नगराध्यक्ष पदासाठी पूजा करलकर व नगरसेवक पदासाठी उर्वरित उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. उबाठा शिवसेनेने सर्व उमेदवार हे सामान्य कुटुंबातील आणि सामान्य जनतेसाठी काम करणारे तसेच भ्रष्टाचार विरहित असे उमेदवार दिले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी देखील अनुभवी चेहरा असावा, दुसऱ्यांच्या कलेने चालणारा उमेदवार नसावा, असे जनतेमधूनच मत होते. म्हणूनच आम्ही पूजा करलकर यांना नगराध्यक्ष उमेदवारी दिली आहे, मालवण नगरपालिका निवडणूक आम्ही जिंकू, असा विश्वास आम्हाला आहे, असे यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेसमोर शक्तीप्रदर्शन करीत पूजा करलकर यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तसेच उर्वरित नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांचे अर्जही दाखल करण्यात आले. माझ्या सारख्या सर्वसामान्य महिलेला उबाठा शिवसेनेने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली याबद्दल मी पक्षाची आभारी आहे. माझी कोणाबद्दल कसलीही तक्रार नाही. जनता नगराध्यक्ष म्हणून मला कौल देईल, असा विश्वास यावेळी पूजा करलकर यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, गणेश कुडाळकर, पूजा करलकर, दिपा शिंदे, मंदार ओरसकर, निनाक्षी मेतर, महेश जावकर, तपस्वी मयेकर, तृप्ती मयेकर, श्वेता सावंत, रश्मी परुळेकर, उमेश मांजरेकर, प्रमोद करलकर अमेय देसाई, राजा शंकरदास, उमेश चव्हाण, अन्वय प्रभू तसेच काँग्रेसचे बाळू अंधारी, गणेश पाडगांवकर, आदी व इतर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg