loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा-सांगवड रस्त्याच्या दुतर्फा गवतामुळे अपघाताची शक्यता; प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी

म्हसळा (वार्ताहर) - म्हसळा-सांगवड मार्गावर रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत अपघाताला निमंत्रण देत आहे. मात्र, पावसाळा संपला असूनही रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या गवताची छाटणी झाली नसल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांतून नाराजीचा सूर उमटत आहे. काही ठिकाणी वाढलेले गवत सात ते आठ फुट वाढले असल्यामुळे समोरील येणार्‍या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांची समस्या गंभीर बनत आहे. मात्र, असे असले तरीसुद्धा अपघात झाल्यावर संबंधित या रस्त्याच्या अधिकार्‍यांना जाग येईल का, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे. गावागावातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. हे गवत थेट रस्त्यावर आल्याने आधीच अरुंद व खड्डे पडल्याने अपघातग्रस्त बनलेले रस्ते या गवतामुळे अधिकच धोकादायक बनले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समोरून आलेले वाहन दिसत नसल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांमध्ये अपघात होण्याची शक्यता वाढल्याने या रस्त्यांवरून वाहने चालविणे अधिकच धोक्याचे बनले आहे. या गवतामुळे दोन्ही बाजूंनी रस्ता चिकट बनल्याने तो अधिक धोकादायक बनला आहे. गावागावांतील रस्त्यांवरील गवत काढणे ही बांधकाम विभागाची जबाबदारी आहे; मात्र कोणत्याच रस्त्यावरील दोन्ही बाजूचे गवत कधीच काढले जात नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी गवत काढायचे काम लवकर चालू करू असे सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg