loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली रांजाणेवाडी स्टॉप ते वरवेली चिरेखाण फाटा रस्त्याची दुर्दशा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली रांजाणेवाडी स्टॉप ते वरवेली चिरेखाण फाटा रस्त्याची दुर्दशा झाली असून या मार्गावरून वाहने चालवणे धोक्याचे बनले आहे. याच मार्गावरून सतत जांभा दगडाची जड वाहतुक दररोज सुरू असते त्यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कुणाचेच लक्ष नसल्याने या रस्त्यावरून छोटी वाहने चालवताना खड्ड्यांचा त्रास वाहन चालकांसह नागरिकांना होत आहे. या रस्त्यावरून चालणे देखील नागरिकांना मुश्किल झाले असून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत तसेच बांधकाम विभागाकडे करून देखील कुणीही या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. सदरचा रस्ता शासन व प्रशासना कडून दुर्लक्षित झाला असून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रस्त्याला दुतर्फा गटारे नसल्याने तसेच उताराचा भाग असल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी या रस्त्यावरून जात असताना नदीचे स्वरूप तयार होते. याच मार्गावरून जांभा दगडाची वाहतूक होत असते. परंतु चिरेखाण मालकांकडून सुद्धा या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत नाही. या रस्त्यावरून एस.टी. वाहतूक सुद्धा सुरू असते परंतु खड्डेमय रस्त्यामुळे एस.टी. वाहतूक सुद्धा बंद पडण्याच्या स्थितीत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा ग्रामस्थांना आंदोलन छेडावे लागले होते, परंतु आंदोलन छेडल्यानंतर वरवेली फाटा ते वरवेली पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

परंतु जल जीवन मिशन अंतर्गत वरवेली नळपाणी योजना व भूमिगत वीज वाहिन्यांचे काम करताना रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याची खुदाई करण्यात आली सध्या ती खोदाई करताना रस्ताही खोदला गेला आहे तसेच क्रॉसिंग करताना सुद्धा रस्ता खोदला गेला आहे त्यामुळे वरवेली रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या संदर्भात कोणीही आवाज उठवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg