loader
Breaking News
Breaking News
Foto

स्मार्ट मिटर संदर्भात मनसे आक्रमक, विपरीत घटना घडल्यास अधिकारी जबाबदार - मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ

सावंतवाडी - स्मार्ट मिटर संदर्भात महावितरण चे अधिकारी आणि राज्यसरकार लोकांना संभ्रमात ठेऊन स्मार्ट मीटरची सक्तीक करत आहेत. हे चुकीचे असून केव्हाही नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होवू शकतोे. त्यामुळे एखादी घटना घडल्यास त्याला महावितरणचे अधिकारी जबाबदार असतील, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्मार्ट मिटरची सक्ती कुठचाही जुना मिटर खराब झाला त्या जागी दुसरा मिटर बसवायचा तर स्मार्ट मिटरच बसवणार अशी चालु आहे. महावितरणच्या अधीकांर्‍याची जबरदस्ती स्मार्ट मिटर बसवण्यास गेलेल्या गावपातळी वरच्या कर्मचार्‍यास ग्राहकांच्या रोषास सामोरे जावे लागते वरून महावितरण अधीकारी जबरदस्ती करतात आणि खाली कर्मचारी भोगतात स्मार्ट मिटर संदर्भात विचारणा केली असता नोव्हेबर २०२५ पर्यंत जुने मिटर काढून नविन स्मार्ट मिटर बसवण्याची कमर्शीअल ऑर्डर आहे असे अभियंता राक्षे यांनी स्पष्ट केल आहे. ग्राहकांना विद्युत सेवा व्यवस्थित देता येत नाही आणि जर मनमानीने करून ग्राहकांना वेटीस धरून महावितरण काय साध्य करू पाहते या जबरदस्तीने लोकांना नाहक ञास झाल्यास मनसे तुम्हाला जशास तस उत्तर देईल. असेही सुधीर राऊळ यांनी म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg