loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकांची दोन दिवसात घोषणा?

मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच येत्या दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. न.प. पाठोपाठ जि.प. आणि पंचायत समितीच्या निवडणुका डिसेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका गेल्या चार वर्षांपासून रखडल्या होत्या. या रखडलेल्या निवडणुकीला आता मुहूर्त लागला आहे. राज्यातील २८८ नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी पार पडली. त्यासाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. त्यातच आता दुसर्‍या टप्प्यात होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला आहे. त्याची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३ टप्प्यात होणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात होत असलेल्या २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. तर तिसर्‍या टप्यात राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आता राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त देखील आता ठरला आहे. त्याची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याची माहिती सुत्राने दिली. त्यामुळे पुढच्या महिन्यात होत असलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या तिसर्‍या अथवा शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची घोषणा लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते २० डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका २० डिसेंबरनंतर होतील, अशी शक्यता होती. मात्र, आता यामध्ये बदल होणार असून दोन दिवसात निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे येत्या २० ते २५ दिवसांत या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. तर महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर जानेवारी महिन्यात पूर्ण केल्या जातील, असे समाजते. २२ ते ३० डिसेंबर दरम्यान राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. नगरपालिका व नगरपंचायतीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला मुहूर्त लागणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg