loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरमध्ये घरासमोरील नोटीस बोर्डावरील मजकुर लिहून अनोखा प्रचार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायत निवडणूकित भाजपच्या उमेदवाराने मत मागावयास येऊ नये. अशी सूचना गुहागर शहरातील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गजानन दीक्षित यांनी त्यांच्या घरासमोर असलेल्या विहिपच्या नोटीस बोर्डवर सूचना लिहून ठेवली आहे. यामुळे शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला असून हा नाराजीचा संदेश शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. गुहागरमध्ये नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. उमेदवार अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु झाली असून अनेक उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवार पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असल्याने तसेच रविवार दिवस जरी शासकीय सुट्टी असली तरी या दिवशी उमेदवारी अर्ज भरता येईल अशा सूचना असल्याने या दोन दिवसांमध्ये सर्वच पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरले जातील. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी जोरदारपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी भाजपनेही आपले उमेदवार या निवडणुकीसाठी उभे केले आहेत. अशावेळी विश्व हिंदू परिषदेच्या जुन्या, अनुभवी व उच्चशिक्षित तसेच आदर्श शिक्षक म्हणून हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे ज्यांनी अविरतपणे कार्य केले.. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी गजानन दीक्षित यांनी आपल्या घराच्या बाहेर नोटीस बोर्डवर "गुहागर नगरपंचायत निवडणूकित भाजपच्या उमेदवाराने मत मागावयास येऊ नये"... अशा आशयाची सूचना करुन आपली नाराजी व खदखद व्यक्त केली आहे.

टाइम्स स्पेशल

विहिपचे गजानन दीक्षित यांनी सांगितले की, दाभोळ वीज कंपनीच्या काळात आम्ही अंगावर केसेस घेतल्या मात्र, यातील काहींनी ठेका घेतला. तसेच इतर पक्षांतून आलेल्यांना भाजपमध्ये जिल्ह्या पातळीवरील उच्च पदे मिळतात. तसेच उमेदवारीही देण्यात आलेली आहे.आम्ही आयुष्यभर सतरंज्या उचलायच्या आणि नव्यानी निवडणुका लढवायच्या अशी आपली संतप्त भूमिका मांडून आपली गुहागर भाजपवरील नापसंती व्यक्ती केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg