loader
Breaking News
Breaking News
Foto

'शहा सायकल'चे मालक नजीर शहा यांचे ​हृदयविकाराच्या झटक्याने निधन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - शहरातील जुने आणि प्रतिष्ठित व्यावसायिक, 'शहा सायकल'चे मालक नजीर शहा (वय ७०, रा. कटंक पाणंद) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंतवाडी शहरात शोककळा पसरली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, नजीर शहा हे नेहमीप्रमाणे सायकलने फेरफटका मारण्यासाठी कोलगाव येथे गेले होते. त्या ठिकाणी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहा यांचे सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै व्यापारी संकुलात 'शहा सायकल' नावाचे दुकान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी हा व्यवसाय निष्ठापूर्वक चालवला. सायकल विक्री आणि दुरुस्ती क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून त्यांची ओळख होती. सायकल व्यवसायासोबतच त्यांनी हॉटेल व्यावसायिक म्हणूनही काम केले होते. ​नजीर शहा यांची एक उत्तम क्रिकेटपटू म्हणूनही शहरात ओळख होती. विशेषतः बॅट्समन म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जात असे. ​त्यांच्या पश्चात, येथील 'पीटर इंग्लंड'चे मालक नजीम शहा आणि नजमा शहा हे पुत्र-कन्या असा परिवार आहे. एक मनमिळाऊ व्यावसायिक आणि खेळाडू गमावल्याची भावना सावंतवाडीतील नागरिकांमध्ये आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg