loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण-कणकवली बसफेरीच्या अनियमिततेमुळे कट्टा परिसरातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय

मालवण (प्रतिनिधी) - मालवण आगारातून सायंकाळी ४ वाजता सुटणारी मालवण - कणकवली बस फेरी अधूनमधून रद्द करण्यात येत असल्याने तसेच वेळेत येत नसल्याने कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये शिकणार्‍या आजबाजूच्या गावातील मुलांची सायंकाळी घरी जाताना मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बसफेरी दररोज नियमित व वेळेत सुरु ठेवावी, अशी मागणी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे मालवण आगार व्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आली. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्यासह सचिव सुनील नाईक, वराडकर हायस्कुलचे पर्यवेक्षक महेश भाट, शिक्षक संजय पेंडुरकर यांनी मालवण एसटी आगारव्यवस्थापक यांची भेट घेऊन अनियमित बस फेरीबाबत लक्ष वेधत निवेदन सादर केले. मालवण आगारामधून रोज सायंकाळी ४ वाजता सुटणारी मालवण - कणकवली बस वेळेत सोडण्याबाबत अनेकदा लेखी पत्र तसेच फोन करून विनंती केली गेली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परंतु याबाबत मालवण आगाराकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलटपक्षी हि बस काही वेळा अचानकपणे रद्द करण्यात येते. त्यानंतर येणार्‍या मालवण पुणे बसमध्ये कट्टा बसथांब्यावर वाट बघणार्‍या विद्यार्थ्यांना घेतले जात नाही. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायंकाळी ६.३० वाजे पर्यंत थांबावे लागते. विद्यार्थ्यांना घरी जाण्यास उशीर होतो. पालकांमधूनही याबाबत संताप व्यक्त होत असून आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास सायंकाळी उशीर होत असल्याने पालकांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. यामुळे मुले घरी पोहचेपर्यंत शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी वाढली आहे, असे यावेळी संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर यांनी सांगितले. तसेच सध्या कट्टा पंचक्रोशीत घरफोडी व खुन सारख्या घटना घडत आहेत. सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना बस वेळेत येत नसल्याने किंवा बस फेरी रद्द झाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत घरी पोहचणार्‍या मुलांच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो.

टाईम्स स्पेशल

अनेक विद्यार्थ्यांना दुर्गम भागातून चालत घरी जावे लागते. बस फेरीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या जिवितास तसेच विद्यार्थिनींच्या बाबतीत काही चुकीचे घडल्यास व पालकांनी याबाबत उठाव केल्यास त्याला एसटी प्रशासन जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही या निवेदनाद्वारे सांगण्यात आले. कट्टा परिसरातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची गंभीरतेने दखल घेऊन सायंकाळची मालवण - कणकवली बस फेरी नियमित सुरु करावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी अजयराज वराडकर यांनी केली. ङ्गङ्गमालवण एसटी आगारात चालक व वाहक यांची कमतरता निर्माण झाली असल्याने बस फेर्‍यांबाबत अडचणी निर्माण होत आहेत. मालवण - कणकवली बसफेरी बाबत विभागीय अधिकार्‍यांचे लक्ष वेधून येत्या मंगळवारपर्यंत योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आगार व्यवस्थापकांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg