loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला ‘स्मार्ट पोलीसिंग’साठी मानांकन

रत्नागिरी (जमीर खलफे) - रत्नागिरी: कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हेगारी प्रतिबंध तसेच नागरिक सेवा प्रदान करण्याच्या निकषांवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मोठे यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील सर्व १९ पोलीस ठाणी, ४ उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालये आणि महत्त्वाच्या मोटर परिवहन विभाग, रत्नागिरी यांना ‘ISO 9001:2015 प्रमाणित स्मार्ट पोलीसिंग प्रमाणपत्र’ प्राप्त झाले आहे. पोलीस दलासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’ अंमलबजावणी आणि प्रमाणन प्रक्रियेसाठी रत्नागिरी पोलीस दलाने १ जून २०२४ रोजी SOAR मॅनेजमेंट सर्विसेस अँड SOAR कॅन्सलटिंग सर्विसेस, चिंचवड, पुणे या संस्थेकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा आणि भारत सरकारने विहित केलेल्या निकषांचा समावेश होता. या निकषांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी रोखणे, जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, नागरिकांना विविध सेवा तत्परतेने पुरवणे, तसेच पोलीस विभागाची योग्य स्थापना, आवश्यक कागदपत्रे आणि पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे प्रभावी प्रशिक्षण यांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासोबतच, संपूर्ण पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदार यांची कार्यक्षमता, प्रयत्न आणि एकसंघपणे काम करण्याची इच्छाशक्ती या गुणांचेही मूल्यांकन करण्यात आले. SOAR मॅनेजमेंट सर्विसेस अँड SOAR कॅन्सलटिंग सर्विसेसने ९० दिवसांच्या कालावधीत रत्नागिरी पोलीस दलातील नमूद सर्व निकष आणि बाबींची कसून तपासणी आणि पडताळणी केली. या कठोर मूल्यांकनानंतर जिल्ह्यातील सर्व १९ पोलीस ठाणी, ४ DySP कार्यालये आणि मोटर परिवहन विभागाला ‘ISO 9001:2015 (क्यू.एम.एस) प्रमाणित स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकन’ प्रदान करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

पोलीस दलाच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल, आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान मा. पोलीस अधीक्षक रत्नागिरी, नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि मोटर परिवहन विभागाच्या प्रमुखांना ही मानांकन प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामुळे रत्नागिरी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत आणि नागरिक-केंद्रित सेवेत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg