loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल मनपा १४ प्रभागांच्या आरक्षणात फेरबदल, ओबीसी (महिला) सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नवी सोडत

पनवेल :- पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीच्या आरक्षण प्रक्रियेत महत्त्वाचा बदल होत असून संपूर्ण शहराचे लक्ष लागलेल्या १४ प्रभागांच्या आरक्षणात फेरबदल करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत. विशेषतः नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या जागांसाठी नव्याने सोडत घेण्याचा कार्यक्रम आता १७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. १४ प्रभागांचा नव्या आरक्षण प्रक्रियेत समावेश राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रानुसार खालील १४ प्रभागांचा नव्या आरक्षण सोडतीत समावेश करण्यात आला आहे: प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, १०, १३, १४, १६, १९ आणि २०. या १४ प्रभागांमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) श्रेणीसाठी एकूण ६ जागांची सोडत नव्याने काढण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. तसेच, या बदलामुळे उर्वरित संरचनेनुसार सर्वसाधारण महिला प्रवर्गातील जागादेखील नियमानुसार नव्याने आरक्षित करण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

११ नोव्हेंबर रोजी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत पार पडली होती. मात्र, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या विशेष प्रवर्गासाठी अधिक व्यापक पुनर्गठन आवश्यक असल्याचे आयोगाने निर्देशित केल्याने ही प्रक्रिया पुन्हा राबवावी लागत आहे. नवी आरक्षण सोडत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजताआद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या वेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सोडतीसह नियमांनुसार सर्वसाधारण महिला प्रवर्गातील जागांचीही नव्याने नियुक्ती केली जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

सुधारित प्रारूप आरक्षणावरील हरकती १९ नोव्हेंबरपासून नव्या सोडतीनंतर जाहीर होणाऱ्या सुधारित प्रारूप आरक्षणाबाबत नागरिकांकडून ते २५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. चौकट हरकती दाखल करण्यासाठी व्यवस्थाइच्छुक नागरिकांनी पनवेल महानगरपालिका मुख्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात लेखी अर्ज दाखल करून हरकती नोंदवू शकतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg