loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयात सिटी स्कॅन आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत सेवेचा शुभारंभ

रत्नागिरी – जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचालित श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, रत्नागिरी येथील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा मोफत सिटी स्कॅन (CT Scan) आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेवांचा भव्य शुभारंभ करण्यात आला. या सेवांचा उद्घाटन सोहळा रोहन बने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला. जिजाऊ संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आणि आसपासच्या परिसरातील हजारो गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी युवकांना महत्त्वपूर्ण आवाहन केले. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्याच्या युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता राजकारण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन यश मिळवावे. जिल्ह्याच्या विकासासाठी सक्रिय योगदान देण्यासाठी युवकांनी पुढे यावे. जिजाऊ संस्थेने झडपोली, शहापूर नंतर रत्नागिरीत सुरू केलेले हे रुग्णालय पूर्णपणे मोफत उपचार पुरवते. मोफत सिटी स्कॅन आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेवांमुळे आता गंभीर निदान आणि दृष्टीदोषांवर वेळेवर उपचार शक्य होणार आहेत. संस्थेचा हा उपक्रम आरोग्य सेवेत क्रांती घडवून आणणारा ठरला आहे.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी संस्थेचे सचिव केदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष अँड.महेंद्र मांडवकर ,श्री. राजेंद्र महाडिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिजाऊ चे तालुकाध्यक्ष श्री मंदार नैकर, श्री.योगेश पांचाळ, उद्योजक गणेश जोशी, श्री आनंद डिंगणकर , कुणबी समाजाचे नेते श्री प्रकाश मांडवकर , राजू धामणे , दीपक सांबरे , शशिकांत गोताड , अँड योगेश मोरे , साहिल गोरे, परशुराम शिंदे , बंटी महाकाळ ,ओंकार तीवरेकर , स्वरूप सावंत ,अँड साईराज कोलते तसेच आदी मान्यवर व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg