loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गुणगौरव

पनवेल :- रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीला व अवैध्यरित्या धद्यांना चांगलाच आळा बसला आहे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावा व गुन्हेगारी पार्श्वभूमीचा बिमोड व्हावा म्हणून त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले होते. परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी चोरींचे प्रमाण वाढत असल्याने चोरींचे प्रमाण रोखण्यासाठी दलाल यांनी खास उपाय योजना राबवून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला निर्देश दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी घरफोडी, चोरी असे प्रकार घडले आहेत आणि ते प्रकार पूर्णतः उघडकीस आणण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या तपासीक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी हे गुन्हे शंभर टक्के उघडकीस आणले आहेत. अशा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केल्याने रायगड पोलीस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेले जवळपास १५ मोबाईल व अतिरिक्त पातळगंगा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या सतवार कोटिंग कंपनीत चोरीस गेलेला मुद्देमाल रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर, महिला पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे, सहाय्यक फौजदार लालासाहेब कोळेकर, पोलीस हवलदार रंजीत खराडे, हेमंत कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल गिरीश नगरकर आदींनी पूर्णतः मुद्देमाल हस्तगत केल्याने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सन्मानपत्र देऊन कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल मेहुल रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनीही पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर, महिला पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे, सहाय्यक फौजदार लालासाहेब कोळेकर, पोलीस हवलदार रणजीत खराडे, हेमंत कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल गिरीश नगरकर यांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg