loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत नसरीन खडस यांनी भरला उमेदवारी अर्ज

रत्नागिरी (जमीर खलफे) - चिपळूण: चिपळूण नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीत एक विशेष लक्षवेधी घटना घडली, ती म्हणजे चिपळूणमधील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या नसरीन खडस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांनी चिपळूण नगरपरिषद वार्ड क्रमांक पाच मधून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला वर्ग तसेच वार्ड क्रमांक पाचमधील कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

टाइम्स स्पेशल

नसरीन खडस यांची चिपळूण शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एक सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना मोठा जनसमर्थन लाभत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज दाखल केल्याने वार्ड क्रमांक पाच मधील लढत आता अधिकच रंजक होणार आहे. त्यांना मिळणारा लोकांचा पाठिंबा पाहता, या निवडणुकीत त्या एक प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg