loader
Breaking News
Breaking News
Foto

पोपटीची मेजवानी खेड खाडीपट्ट्यात बहरणार, अनेक लोक परदेशातून चव घेण्यासाठी कोकणात येणार

संगलट खेड (इक्बाल जमादार) - पोपटी म्हणजे कोकणातील अनेक वर्षांची परंपरा आहे. थंडी आणि वालाच्या शेंगांचा मातीच्या मडक्यात झालेला सुंदर मिलाप.साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसर्या तिसर्या आठवड्यापासून ते थेट फेब्रुवारी-मार्च पर्यंत पोपटीच्या मेजवान्या रंगतात. पोपटी ही हल्ली जरी पार्टी/मेजवानी म्हणुन केली जात असली, तरी ती रात्री शेताची राखण करण्यासाठी जमलेले शेतकरी थंडीपासुन वाचण्यासाठी व जागे राहण्यासाठी विरंगुळा म्हणून केली जात असे. शेतात ज्या भाज्या, शेंगा मिळतात, रानटी उगवलेला भांबुर्डीचा पाला व घरुन पक्त मीठमसाला आणुन हे शेतकरी पोपटी करतात. ही पिढ्यान् पिढ्या चाललेली कोकणी परंपरा कुटुंब, पाहूणे, मित्र अशा सर्वांना बोलावून अजुनही साजरी केली जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोपटी मडक्यात भरून ती शिजेपर्यंत अर्धा-पाऊण तास वेळ लागतो. यादरम्यान धमाल गप्पा रंगतात, जुन्या आठवणी, गाण्यांच्या घरगुती मैफिली यांची रंगत औरच असते. पोपटी ही शाकाहारी व मांसाहारी या दोन प्रकारात केली जाते. वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, रताळी, वांगी, बटाटे यांना मीठ मसाला लावून घेतले जाते. मडक्याच्या बुडात भांबुर्डीचा पाला घालून त्यात भाज्यांचे थर दिले जातात. मांसाहारी प्रकारात चिकनला मसाला लावून केळीच्या पानात बांधून मडक्यात घातले जाते. मडक्याचे तोंड पाल्याने नीट झाकले जाते व ते उलटे ठेवून बाजुला गवत व सुकलेली लाकडे लावून शेकोटी पेटवली जाते. २० मिनिटानी मडके बाजुला काढून पोपटी मोठ्या परातीत काढून त्याचा फडशा पाडायचा. अशा पोपटीचा आस्वाद एकदा तरी नक्की घेणे गरजेचे असते. आता काही दिवसाने खेड खारी पट्टा भागात सुशेरी गावचे नानू भाई कंचावडे प्रसिद्ध असलेला मोगा हा प्रसिद्ध असून त्याची चव घेण्यासाठी अनेक मंडळी मुंबई-पुणे इथून येत असतात. त्यांच्या मुंग्याला वैशिष्ट्य असते. त्यामुळे त्यांचा मोगा हा रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg