loader
Breaking News
Breaking News
Foto

मनमानी पार्किंगला आता ‘ब्रेक’, ठाणे वाहतूक शाखेची कडक मोहीम सुरू

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगने नागरिक त्रस्त झाले असताना, ठाणे वाहतूक शाखेने अखेर कडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर ‘पार्किंग १’ आणि ‘पार्किंग २’ अशी व्यवस्था असूनही अनेक जण मनमानी पद्धतीने वाहन रस्त्यावर उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. चुकीच्या ठिकाणी लावलेल्या वाहनांमुळे मोठमोठे रस्तेही अरुंद होत आहेत आणि कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेने कठोर पावले उचलत बेशिस्त पार्किंगवर थेट दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रस्त्यांवर गस्ती पथके तैनात असून चुकीचे पार्किंग करणार्‍या वाहनचालकांवर कोणतीही सुट न देता दंडाची रीतसर नोंद केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाहतूक पोलिसांकडून ही मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. मुख्य चौक, व्यस्त मार्ग, बसथांबे आणि व्यापारी पट्ट्यांमध्ये ही मोहीम सुरू असून आतापर्यंत अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील शिस्त राखण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. बेशिस्त पार्किंगमुळे शहर ठप्प होते; नियमभंग सहन केला जाणार नाही, असा इशारा वाहतूक शाखेने दिला असून, पुढील काळात कारवाई अधिक कठोर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg