loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत ड्रग्जविरोधात शहर पोलीस ॲक्शन मोडमध्ये! 300 ग्रॅम गांजासह नेपाळी तस्कर जेरबंद

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी दिलेल्या कठोर सूचनेनुसार रत्नागिरी शहर पोलिसांनी मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे. या कारवाईत गांजा हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नेपाळी नागरिकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण 300 ग्रॅम गांजासह 14,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक दिनांक 14/11/2025 रोजी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडवी, पेठकिल्ला आणि मिरकरवाडा मार्गे नियमित पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान, मिरकरवाडा येथील मलबार जेटीच्या बाजूला असलेल्या एका पडीक बोटीच्या केबिनजवळ एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. त्याने पाठीवर हिरव्या रंगाची सॅक लावली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संशयावरून पोलिसांनी त्याला थांबवून सॅकबद्दल चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची आणि असमाधानकारक उत्तरे देण्यास सुरुवात केली. यामुळे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी दोन पंचांच्या समक्ष त्याची अंगझडती घेण्याचा निर्णय घेतला. झडतीदरम्यान, सदर इसमाने त्याचे नाव मोहनसिंग रामचंद्र भाट (वय 26 वर्षे), मूळ रा. गाव भागेश्वर, जिल्हा डडेल्धुर, राज्य-नेपाळ आणि सध्या रा. मिरकरवाडा जेटी, ता. जि. रत्नागिरी असे सांगितले. त्याच्या ताब्यातील हिरव्या रंगाच्या सॅकमधील मधल्या कप्प्यात एका काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीत काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेले, उग्र वासाचे एकूण 300 ग्रॅम वजनाचा “गांजा” हा अंमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी तातडीने गांजासह इतर मुद्देमाल असा एकूण 14,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आणि मोहनसिंग भाट याला ताब्यात घेतले. या प्रकरणी मोहनसिंग रामचंद्र भाट याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 434/2025 अन्वये एन.डी.पी.एस अॅक्ट 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

पुढील तपासात मोहनसिंग भाट याच्यावर यापूर्वी देखील रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 419/2024 अन्वये अमली पदार्थ संबंधी गुन्हा दाखल असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. आरोपीला मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वात पो.उनि. सागर शिंदे, पो.हवा/1399 अमोल भोसले, पो.हवा/1112 आशिष भालेकर, पो.हवा/308 कुशल हातीसकर, आणि पो.हवा/1220 रणजित जाधव यांनी पार पाडली. रत्नागिरी शहरातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg