loader
Breaking News
Breaking News
Foto

अखिल भारतीय कराटे डो चॅम्पियनशिपमध्ये सेंट विल्फ्रेड स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पनवेल - अमृतसर पंजाब येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय कराटे डो चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पनवेल शेडुंग येथील सेंट विल्फ्रेड स्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. अखिल भारतीय कराटे डॉ चॅम्पियनशिप २०२५ अमृतसर पंजाब येथे ८ व ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रातून विविध शाळेतून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या अखिल भारतीय कराटे डो चॅम्पियनशिप मध्ये शेडुंग येथील सेंट विल्फ्रेड स्कूलची सानवी जालरिया (कुमिते) आणि सब जूनियर मुलींच्या गटात (काता) या प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. १३ ते १५ वर्ष वयोगटातील (कॅडट्स कुमिते) मध्ये जयदीप गिरी याने रौप्य पदक पटकावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१० ते १२ वर्षे वयोगटातील (सब ज्युनिअर मध्ये काता) मध्ये रौप्य पदक तर (सब ज्युनिअर कुमिते) मध्ये नियती घावरी हिने कास्यपदक पटकावले. तसेच १० ते १२ वयोगटातील (सब ज्युनिअर कुमिते) मध्ये आदित्य घाडगे याने रौप्य पद जिंकले तर १३ ते १५ वर्ष वयोगटातील (कॅडेट कुमिते) या स्पर्धेत मोक्ष भारद्वाज याने कांस्यपदक पटकावल्याने या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक केशव बढाया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुळा वेणुगोपाल, सीबीएससी बोर्डाच्या मुख्याध्यापिका प्रीती सिंह, महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या क्रीडा विभागातील प्रशिक्षक गुरुप्रीत सिंह यांनी अभिनंदन केले. सेंट विल्फ्रेडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे नाव उंच शिखरावर नेल्याने शालेय व्यवस्थापनाने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg