मालवण (प्रतिनिधी) - मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेने भव्य शक्तीप्रदर्शन करून नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व २० उमेदवारांचे अर्ज दाखल केले. निलेश राणे शांत होता, पण तुम्ही नको त्याच्या नादाला लागलात, असा सुचक इशारा यावेळी आमदार निलेश राणे यांनी दिला. मालवण शहरात गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार असून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व २० ही जागा निवडून आणणारच. आमची कोणाशीही स्पर्धा नाही आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही, मालवण नगरपालिकेचा विजय खासदार नारायण राणे यांना भेट म्हणून देणार असेही यावेळी आम. निलेश राणे यांनी सांगितले.
यावेळी व्यासपिठावर शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उमेश नेरूरकर, राजन सरमळकर, दादा साईल, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, दिपलक्ष्मी पडते, काका कुडाळकर, संजय पडते, बबन शिंदे, राजा गावडे, राजा गावकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, बाळू तारी तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.