loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले जनसेवा आणि विकासासाठी प्रयत्नशील - विशाल परब

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षात शिस्त महत्त्वाची असून, पक्षश्रेष्ठींनी दिलेला उमेदवार सामान्य कुटुंबातील असो वा राजघराण्यातील, पक्षाचा शब्द खाली पडू दिला जात नाही. नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले आहेत, असे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी स्पष्ट केले. युवा नेते विशाल परब यांनी जनतेला विश्वास देत सांगितले की, "आमचे उमेदवार जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणारे आहेत आणि विकासासाठी मेहनत घेणारे आहेत." नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी भाजपने १५ जणांचे अर्ज दाखल केले आहेत. जगात, देशात, राज्यात आणि कोकणात भाजप नंबर वन होती, आहे आणि राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक वर्षे विरोधी मंडळी सत्तेवर होती, मात्र आता आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना सावंतवाडीकर जनता नक्कीच आशीर्वाद देईल, अशी आशा परब यांनी व्यक्त केली. ​पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढवत आहे. ३ डिसेंबरला गुलाल हा भाजपचाच असेल, असा ठाम विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडीचा विकास आणि शहराचा कायापालट हा मुख्य मुद्दा घेऊन भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. ​हॉस्पिटल आणि रोजगाराचा प्रश्न घेऊन भाजप लढणार आहे. या समस्या सोडवण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेत भाजपची सत्ता असणे आवश्यक आहे. ​वैयक्तिक टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचे विशाल परब यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांना अभिप्रेत असलेले सर्वांगीण विकासाचे प्रश्न नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या माध्यमातून मार्गी लावू, असे आश्वासन परब यांनी दिले. ​जनता सुज्ञ आणि सुशिक्षित: सावंतवाडीची जनता सुज्ञ आणि सुशिक्षित असून, ती भाजपच्या सुज्ञ व सुशिक्षित उमेदवारांना नक्कीच विजयी करेल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला. ​ भाजपचे सर्व उमेदवार उच्च शिक्षण घेऊन सामाजिक बांधिलकी जपत काम करणारे आहेत. काही उमेदवारांना माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून कामाचा अनुभव आहे. जनतेला आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधा देण्यासाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

​नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले यांनी सांगितले की, राजघराणे, अधिपती बापुसाहेब महाराज, शिवरामराजे भोसले यांनी शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. "त्यांचा वारसा मला लाभला आहे, तो घेऊन भाजपच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रभागांमध्ये भाजपचे प्रयत्न राहतील," असे त्यांनी नमूद केले. ​खासदार नारायण राणे यांच्या टीकेबद्दल विचारले असता विशाल परब यांनी आदर व्यक्त केला. ते म्हणाले, "नारायण राणे वडीलधारी आहेत. एवढ्या मोठ्या माणसांसमोर बोलण्याएवढा मी मोठा नाही." या प्रश्नावर त्यांनी 'नो कमेंट्स' असे उत्तर दिले. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, वेदीका परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, संदीप गावडे, अँड अनिल निरवडेकर, मनोज नाईक आदी भाजप पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg