loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ स्कूलमध्ये “विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर”

खेड (प्रतिनिधी)- श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यू. कॉलेज (सी. बी. एस. ई.) वेरळ मध्ये रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी इ.१० वीच्या विद्यार्थांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते महाराष्ट्रातील प्रसिध्द भाष्यकार माधव अंकलगे यांचे संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी माधव अंकलगे यांनी आपल्या प्रखर व प्रभावी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर व सोप्या भाषेत परीक्षेच्या वेळेचे नियोजन, समजपूर्वक वाचन याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच दहावी नंतर योग्य करिअर‎ निवडणे हे विद्यार्थी आणि त्यांचे‎ पालक दोघांसाठी आव्हानात्मक‎ असते. परंतु त्यातून योग्य पर्याय कसा निवडावा याविषयी विशेष माहिती दिली. मान्यवरांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक प्रेरित झाले.

टाइम्स स्पेशल

तसेच विनोद सिंग, आदर्श गौरव, नागेंद्र सिंग, जास्मिन देसाई व रोमा मन्ना यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्ष सुप्रिया पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस.अली, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहर कौचाली, मिनाक्षी आंब्रे व आभार प्रदर्शन अक्सा रूमाने यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg