loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले येथील सुप्रसिध्द कडयावरील श्री गणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष विनायक निजसुरेंचे निधन

दापोली (प्रतिनिधी) : कडयावरील गणपती म्हणून सर्व दुर ख्याती पावलेल्या दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील सुप्रसिध्द कडयावरील गणपती देवस्थानचे १८ वर्षं अध्यक्ष पदावर कार्यरत राहिलेल्या मुळ आंजर्ले येथील विनायक ऊर्फ विना काका निजसुरे यांचे सध्या ते वास्तव्य करित असलेल्या ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा जन्म दि. १५ मार्च १९४४ तर त्यांचा मृत्यू दि. १५ नोव्हेंबर २०२५ झाला. विनायक वामन निजसुरे यांनी २००६ ते २०२४ असे सलग १८ वर्ष कड्यावरील श्री गणपती देवस्थान, आंजर्ले चे अध्यक्ष म्हणून काम पहिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान च्या हिताचे व विविध विकासात्मक निर्णय घेण्यात आले. त्यांना विविध प्रकारचे छंद होते ( वाचन, विविध प्रकारची जुनी – नवी नाणी व नोटा जमवणे, विविध पुस्तक संग्रह, वर्तमानपत्रातील माहितीपर लेख यांची कात्रण संग्रही ठेवणे इ.) त्यांच्या मित्रमंडळींच्या सहकार्याने त्यांनी अनेक ठिकाणी विनामुल्य प्रदर्शन हि आयोजित केली होती. त्यांना Mumbai Coin Society या नाणी विषयातील देशातील अग्रगण्य संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार ऑक्टोबर २०१५ मध्ये मिळाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एक कर्तृत्ववान हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून ते येथील सर्वांच्याच कायमच आठवणीत राहतील. आंजर्ले परीसरातील ३ पिढ्यांना सावरकर आणि हिंदुत्वाच्या संस्कारात घडवण्याचे पवित्र काम या परिवाराने केले आहे. आंजर्ले येथील कडयावरील गणपती देवस्थानचा कारभार म्हणजे समरसतेचा आदर्श असे आदर्श व्यक्तीमत्व वृद्धापकाळाने हरपले. त्यांच्या जाण्याने आंजर्ले तसेच दापोलीत शोककळा पसरली आहे. त्यांची उणीव कायम लक्षात राहील. अशा या आदर्श व्यक्तिमत्वाच्या पश्चात वयोवृध्द पत्नी, विवाहित मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आंजर्ले कडयावरील गणपती देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष सुरेश म्हादलेकर तसेच देवस्थान कमिटी त्याचप्रमाणे देवस्थान कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg