loader
Breaking News
Breaking News
Foto

रमेशभाई कदम मिरवणूकीने निघाले, सोबत कोकण तोफ आ. भास्करराव जाधव

चिपळूण (वार्ताहर) - चिपळूण नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकप्रिय नेते आणि माजी आमदार रमेशभाई कदम भव्य मिरवणूकीने उपविभागीय कार्यालयाकडे निघाले आहे. त्यांच्या सोबत कोकणची तोफ आणि गुहागरचे आमदार भास्करराव जाधव आपल्या फौजफाट्यासह सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रमेशभाई कदम उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेे आहेत, हे कानोकानी पसरल्यानंतर चिपळूणमधील असंख्य नागरिक त्यांच्यासोबत निघाले आहेत. चिपळूण शहरात मोठे पाठबळ लाभलेले रमेशभाई कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केल्यानंतर संपूर्ण चिपळूण शहरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. लोकांच्या हितासाठी झटणारे रमेशभाई कदम यांचे नेतृत्व सर्वमान्य नेतृत्व असल्याने त्यांना मोठा पाठिंबा शहरातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच लाभला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg