loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखात हातभट्टीवर पोलिसांचा छापा, १ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

(प्रतिनिधी) - देवरूख येथील चाफ्याचाऱ्या येथे पोलिसांनी विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारुवर मोठी कारवाई केली. या कारवाई साहित्यासह १ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरुख पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण रावजी पर्शराम (वय ६०, रा. पर्शरावाडी, देवरुख ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवार दि. १५ रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास देवरुख-पर्शरामवाडी येथील चाफ्याचा पऱ्या या ठिकाणी जंगलमय भागात निदर्शनास आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पर्शरामवाडी येथील चाफ्याच्या पऱ्या येथे कारवाई केली. त्यावेळी संशयित विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु गाळत असताना सापडला.त्यांच्याकडून ७ हजार ७०० रुपयांचे२०० लिटरचे पत्र्यांचे बॅरल, १५० लिटर गरम गुळ नवसारगर मिश्रीत, कुञ्जके रसायन, ५०० रुपयांचा चाटू, २ हजार ७०० रुपयांचे २५ लिटर दारु, ८० हजारची २०० लिटरची ८ प्लास्टिकची बॅरल, १ हजार ६०० रुपयांचा गुळ नवसार मिश्रीत तयार केलेले कुजके रसायन, २ हजार ५०० रुपयांचे ५०० लिटरचे बॅरल, ५ हजार रुपयांचे बॅरल असा एकूण १ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सत्यजित दरेकर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

संशयिताविरुद्ध गुन्हा

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg