नवी दिल्ली, दि. १४ : महाराष्ट्रातील स्टार्टअप्स, बचत गट आणि 'एक जिल्हा एक उत्पादन' यांसारख्या उद्योगांना व्यापार वाढीसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. ४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे सांगितले. या मेळाव्यात महाराष्ट्राला भागीदार राज्याचा विशेष दर्जा देण्यात आला असून, हे दालन राज्याच्या विकासाला नव्या दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रगती मैदान येथे आयोजित या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन केले. या प्रसंगी त्यांनी दालनातील सहभागी स्टॉलधारकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांची उत्सुकतेने माहिती घेतली. "राजधानीत अशा मोठ्या मेळाव्यात महाराष्ट्र दालनाची उभारणी राज्य आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे स्टार्टअप्सना गती मिळेल, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि बचत गटांना प्रोत्साहन मिळेल," असे सामंत म्हणाले. तसेच, सरकारकडून उचलण्यात येणाऱ्या आवश्यक पावलांची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली.या उद्घाटन सोहळ्यात उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र सदनचे सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला, व्यवस्थापकीय संचालक विवेक पानसरे आणि सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात झारखंडला फोकस राज्याचा दर्जा देण्यात आला असून, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांना भागीदार राज्य म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.
भारत व्यापार वृद्धी संस्थेच्या (आयटीपीओ) मार्फत आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने 'एक भारत श्रेष्ठ भारत' या थीमवर आधारित महाराष्ट्र दालनाची उभारणी केली आहे. हे दालन १०९८ चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले असून, त्याची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर आधारित आहे. दालनाचा दर्शनी भाग शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना यूनेस्को मान्यता मिळवून देण्यावर केंद्रित आहे, ज्यात किल्ले हे संरक्षण आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक म्हणून मांडले गेले आहेत. दालनात भारताचा मोठा थ्रीडी नकाशा उभारण्यात आला असून, त्यात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार दाखवला आहे. मुख्य किल्ल्यांचे लघु त्रिमितीय मॉडेल्स जसे की रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आणि तोरणा यांचा समावेश आहे. प्रवेशद्वार रायगडच्या नगरखाना गेटच्या दगडी रचनेसारखे असून, त्यात शिवाजी महाराजांचा कांस्य सदृश्य थ्रीडी चित्रण आहे. स्वागत कक्ष कोल्हापूरच्या स्वर्ग मंडप शैलीत असून, डावीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जावर आधारित स्थापत्य आहे, ज्यात महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक आणि भाषिक परंपरेचे प्रदर्शन आहे.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.