loader
Breaking News
Breaking News
Foto

आम. शेखर निकम, प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील व अनिरुद्ध निकम यांचा अभ्यास दौरा यशस्वी

आबलोली (संदेश कदम) - चिपळूण, संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सुनितकुमार पाटील व अनिरुद्ध निकम यांनी बारामती कृषि विज्ञान केंद्र येथील ॲग्रीकल्चर ए आय सेंटर व नेचर डिलाईट डेअरी, इंदापूर येथे सदिच्छा भेट दिली. या दोन दिवशीय अभ्यास दौर्‍यामध्ये ए आय सेंटर मधील नाविन्यपूर्ण व संशोधनात्मक प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान, कृषि विज्ञान केंद्रांतर्गत विविध पिकांवर सुरु असणाऱ्या संशोधनचा अभ्यास केला. तसेच नेचर डिलाईट डेअरी च्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार शेखर निकम व प्राचार्य डॉ.पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीले. नेचर डिलाईट डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई यांनी दोन्ही मान्यवरांचा सन्मान केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय व नेचर डिलाईट डेअरी यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. यानिमित्ताने महाविद्यालयामध्ये विविध कृषिपुरक प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. नेचर डिलाईट डेअरी सदैव या साठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन देखील अध्यक्ष अर्जुन देसाई यांचे तर्फे देण्यात आले. आमदार शेखर निकम, डाॅ.सुनितकुमार पाटील व अनिरुद्ध निकम यांनी डेअरीमधील विविध विभागांना भेट दिली व डेअरी च्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व अनिरुद्ध निकम यांचे हस्ते नेचर डिलाईट डेअरी मधील कुशल अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. या अभ्यास दौऱ्यादरम्यान महाविद्यालयाचे कृषि विभाग प्रमुख डाॅ.हरिश्चंद्र भागडे, प्रा.प्रसाद साळुंके व विपुल घाग उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg