loader
Breaking News
Breaking News
Foto

विधानसभेला जो आमचा विश्वासघात झाला त्यातून आम्ही पण बरच काही शिकलो : आम. जाधव

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - विधानसभेला आमचा जो काही विश्वासघात झाला, जी काय आमची फजगत झाली त्यातून आम्ही बरेच काही शिकलो, असं वक्तव्य आ. जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपंचायत निवडणुका जाहीर होण्याची वाट न बघता 31 जानेवारीच्या पूर्वी होणार म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतिच्या उमेदवारांच्या मुलाखती त्या त्या विभागातील कार्यकर्त्यांन समोर चर्चा करून आम्ही मुलाखती घेतल्या आहेत. गेले चार दिवस मी मुलाखतीचा कार्यक्रम करत आहे. खेड तालुक्यातील 4 चिपळूण तालुक्यातील सहा गुहागर तालुक्यातील पाच अशा एकूण 15 जिल्हा परिषद आणि 30 पंचायत समिती सदस्यांच्या मुलाखती आम्ही घेतले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आम्हाला वाटलं होतं की, आमच्याकडे सत्ता नाही , काही मंडळी आमची लोक चोरून नेत आहेत त्यामुळे आमच्याकडे उमेदवारांची वाणवा भासेल असं काही झालं नाही. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, प्रचंड चिड आहे , हे राज्यकरते जे वागतात ते जनतेला मान्य नाही त्यामुळे आमच्याकडे मोठ्या प्रमाणात उमेदवार आहेत. सर्व उमेदवारांचा एकच म्हणण आहे की, पक्ष जो उमेदवार देईल तो आम्हाला मान्य असेल. गुहागर नगरपंचायतीच्या 17 उमेदवार आणि एका नगर परिषद अध्यक्षाची ही आत्ता आम्ही मुलाखत घेतली आहे. ते सुद्धा उमेदवार पण लवकर जाहीर करणार आहोत असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg