loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथील तरुणाची आत्महत्या; आत्महत्येसाठी ५ जण जबाबदार असल्याचा व्हिडिओत उल्लेख - नातेवाईकांकडून मृतदेह घेण्यास नकार!

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ​बांदा बाजारपेठेत फुलांचे दुकान लावण्यावरून वारंवार होत असलेल्या अटकावामुळे आलेल्या नैराश्यातून आफताब कमरूद्दीन शेख (वय ३८, रा. बांदा-मुस्लिमवाडी) या तरुणाने बुधवारी पहाटे आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आफताब शेख यांनी एक भावनिक व्हिडिओ बनवला. ​या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येला बांदा शहरातील पाच जण जबाबदार असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. ​व्यवसाय करू न दिल्याने घरची परिस्थिती हलाखीची झाली असून, पत्नी-मुलांचे हाल होत असल्याचे सांगून, 'माझ्या मुलांना सांभाळा' अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आफताब यांचे बांदा बाजारपेठेत फुलांचे दुकान होते.​ आठ महिन्यांपूर्वी त्यांनी दुकान लावताना, 'फुलांवर थुंकल्याचा' आरोप करत शहरातील काही तरुणांनी दुकान लावण्यास अटकाव केला होता.​ यामुळे तब्बल आठ महिने त्यांना व्यवसाय करता आला नाही. ​जत्रोत्सव हंगाम सुरू झाल्याने त्यांने पुन्हा दुकान सुरू केले, मात्र त्यातील काही लोकांनी पुन्हा व्यवसाय करू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. ​ही घटना बुधवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. ​गळफास लावल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला तातडीने बांदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात, त्यानंतर गोवा-बांबुळी येथे नेत असताना त्यांचे निधन झाले.

टाइम्स स्पेशल

याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.​ परंतु, आफताबच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या पाच जणांना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. ​"जोपर्यंत संबंधितांना अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही," असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.​ या पार्श्वभूमीवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg