loader
Breaking News
Breaking News
Foto

"छावा' चा प्रयोग शिवाजी नाट्य मंदिर मुंबई येथे रंगणार

दोडामार्ग (प्रतिनिधी) - नाट्य संपदा गोवा निर्मित, शिवाजी सावंत लिखित व चंद्रशेखर गवस दिग्दर्शित रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या छावा नाटकाची विक्रमी घोडदौड नाट्य पंढरी शिवाजी मंदिर दादर पर्यंत पोचली आहे. दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी ३.३० वाजता ह्या नाटकाचा प्रयोग प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या अभिनेत्री जान्हवी पणशीकर ह्यांच्या उपस्थितीत सादर केला जाणार आहे . गेल्या वर्षी ह्याच नाटकाचा प्रयोग पिंपळेश्वर देवाच्या वर्धापन दिनानिमित्त दोडामार्ग येथे सादर केला होता. त्याला रसिक प्रेक्षकांनी विक्रमी प्रतिसाद देत नाटकाचं व चंद्रशेखर गवस यांच्या संभाजीच्या भूमिकेचं भरभरून कौतुक केलं होतं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्या नाटकातील शंभू राज्याभिषेक अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. ह्या नाटकातील सगळ्या व्यक्तीरेखा विशेष ढंगाने सादर केल्या जातात असंही बोललं जातं. गोवा राज्यस्तरीय ऐतिहासिक नाट्य स्पर्धेत छावा नाटकाला विक्रमी नऊ पारितोषिक लाभली होती. ज्यात चंद्रशेखर गवस यांना उत्कृष्ट दिग्दर्शक व संभाजीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक लाभलं होतं. तर हेच नाटक नाट्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी मंदिर दादर येथे मुंबईकर रसिक प्रेक्षकांच्या साक्षीनं सादर केलं जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

त्याच बरोबर ३० ऑक्टोबर २०२५ रोजी त्याच रंगमंचावर दुपारी ३.३० वाजता चंद्रशेखर गवस दिग्दर्शित नाट्य संपदा प्रस्तुत वसंत कानेटकर लिखित अफजल खान वधावर आधारित आकाशमीठी हे नाटक सादर केलं जाणार आहे. ज्यात गवस शिवाजी महाराजांची भूमिका सादर करतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg