loader
Breaking News
Breaking News
Foto

अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष! आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी अटकेत

संगलट( खेड)( प्रतिनिधी) - नवी मुंबईतील नागरिकांना अमेरिकन डॉलर कमी दरात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या झारखंडस्थित टोळीचा पर्दाफाश रबाळे पोलिसांनी केला आहे. या टोळीने घनसोलीतील एका तरुणाकडून तब्बल ₹३ लाख घेऊन डॉलर न देता फसवणूक केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सहाही आरोपींना अटक केली असून या कारवाईत तीन फसवणूक प्रकरणांची उकल झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी मोहमद राहुल लुकमान शेख उर्फ रफीक, आलमगीर आलम सुखखू शेख, खोसमुद्दीन मोहम्मद शेख उर्फ येलीम, रिंकू अबुताहीर शेख, रोहीम बकसर शेख आणि अजीजुर रहमान सादिक शेख (सर्व रा. मुंब्रा, ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी झारखंडस्थित टोळीशी संबंधित असून त्यांनी नवी मुंबईसह राज्यातील इतर भागातही अशा प्रकारच्या फसवणुका केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

टाइम्स स्पेशल

या कारवाईत सहा. पो. नि. दिपक खरात यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि CCTV पुराव्यांच्या आधारे आरोपींना अटक केली. "नागरिकांनी अशा चलनविषयक प्रलोभनांना बळी न पडता अधिकृत मार्गाचा वापर करावा," असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिला. या कारवाईतून रबाळे पोलिसांनी आंतरराज्य फसवणूक टोळींवर प्रभावी कारवाई करण्याची आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg