loader
Breaking News
Breaking News
Foto

वाशी तर्फे देवरुख वास्करवाडी येथे ग्रामस्थांचा आरोग्य तपासणीला उत्तम प्रतिसाद

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - देवरुख नजीक असणारे वाशी तर्फे देवरुख येथील वास्कर वाडी, कंरडेवाडी येथील ग्रामस्थ यांची संगमेश्वर तालुका आरोग्य कार्यालय मोबाईल युनिट टिम आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर धामापूर उपकेंद्र वाशी वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, किटकजन्य व जलजन्य आजार तपासणी, किरकोळ आजार तपासणी, स्तनदा माता तपासणी, आयुष्यमान कार्ड काढणे, निश्चय आयडी काढणे, मोति बिंदू, क्षयरोग, कर्करोग, लेप्रेसी, असंसर्गजन्य आजार, किटकजन्य आजार याबाबत आरोग्य विषयक मार्गदर्शन, पंतप्रधान आयुष्यमान ५ लाख मोफत उपचार कार्ड, मातृत्व लाभ, आरोग्य विषयक जनजागृती व मार्गदर्शन डॉ. खाडे वैद्यकिय अधिकारी मोबाईल युनिट टिम, नरोटे औषध निर्माण अधिकारी, पी. एस. इंगळे आरोग्य सेविका, विजय राऊत आरोग्य सेवक, मनिषा सावंत आशा सेविका, अंजली कांबळे अंगणवाडी सेविका, रेवणे वाहन चालक यांच्या टिमने हा उपक्रम संपन्न केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आरोग्य तपासणीला विशेष म्हणजे वयोवृद ग्रामस्थ यांनी लाभ घेतला. आरोग्य तपासणी औषध उपचार, औषध वाटप मोफत शासनाच्यावतीने दवाखाना आपल्या दारी व अति दुर्गम भागात येऊन उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल वाशी तर्फे देवरुख गावाच्या सरपंच निकिता ताई कंरडे, उपसरपंच सुनिल सावंत, माजी सरपंच रविंद्र वास्कर, तंटा मृक्ती अध्यक्ष अनंत वास्कर, युवा नेते दिपक वास्कर, गणपत सावंत, सतोष वास्कर, विष्णू सावंत, तन्वी वास्कर यांनी समाधान व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

आरोग्य तपासणी कार्यक्रम जेष्ठ कार्यकर्ते सुभाष सावंत यांच्या घर सभामंडपामध्ये घेण्यात आला. हा उपक्रम डॉ. अनिरुद्ध आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. गोविद मोरे संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. व्ही. आर. रायभोळे वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली डॉ. भक्ती वाजे वैद्यकिय अधिकारी धामापूर, डॉ. श्वेता पवार वैदकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक अशोक बोरसे, प्रशांत अहिरे, आरोग्य सहाय्यीका स्वाती गुरव, लंवदे सिस्टर यांनी सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg