loader
Breaking News
Breaking News
Foto

दादरमधील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर मध्ये २ नोव्हेंबरला रंगणार सप्तरंगी कोकण कलामंच'चे 'नमन'

मुंबई - कोकणच्या मातीतील अस्सल लोककलांची परंपरा जपणारा आणि विशेषतः स्त्रीपात्रांनी नटलेला मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम "नमन" लवकरच मुंबईतील दादर येथे रसिकांच्या भेटीला येत आहे. 'सप्तरंगी कोकण कलामंच (मुंबई)' प्रस्तुत हा कार्यक्रम रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी, रात्री ठिक ७:३० वाजता, श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, दादर (प.) येथे सादर होणार आहे. कोकणच्या पारंपारिक लोककलांचे सौंदर्य आणि आधुनिक आशय यांचा मिलाफ या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या "नमन" मध्ये बहारदार संगीत, लयबद्ध नृत्य अविष्कार आणि भक्तीमय गण, सवंगड्यांची धमाल तसेच मावशीची कमाल असलेली खास गवळण सादर केली जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पारंपरिक कलाविष्कारासोबतच, कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे "कर्ता" ही हृदयस्पर्शी, काल्पनिक-कौटुंबिक नाट्यकलाकृती. ही नाट्यकलाकृती वर्तमानकाळातील सामाजिक वास्तवावर भाष्य करणारी आणि प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी आहे. कलामंचचे सूत्रधार प्रकाश बारस्कर, सचिन कुरटे, अमर वेलोंडे, साहिल चोरट आणि राकेश डाफळे असून संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना सुनिल शिवराम घेवडे यांची आहे. मंगेश कुळये यांनी कलामंचाची स्थापना केली असून गणेश घेवडे हे कलामंच प्रमुख आहेत.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाची निर्मिती वसंत वाघे यांनी केली आहे. "कर्ता" या नाट्यकृतीचे लेखन व दिग्दर्शन मिलिंद रेश्मा विनायक ठिक यांनी केले आहे, तर गवळण दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी कैलास करिष्मा केशव सोलकर यांनी सांभाळली आहे. दादरच्या नाट्यमंदिरात कोकणी लोककलेची ही अनोखी मेजवानी अनुभवण्याची संधी कोकणकराबरोबर मुंबईकर रसिकांनीहि सोडू नये, असे आवाहन 'सप्तरंगी कोकण कलामंच' ने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg