loader
Breaking News
Breaking News
Foto

शेअर मार्केट : पोर्शे कार आणि कोटींच्या वादातून सावंतवाडीत हाणामारी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी मधील शेअर बाजारात गुंतवणूक करणारे सागर कारिवडेकर याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुणे येथील पाच जणांना न्यायालयीन कोठडी आणि सावंतवाडी - बांदा मधील चौघांना उद्या २९ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ​सावंतवाडी येथील शेअर मार्केट गुंतवणूकदार सागर कारिवडेकर आणि पुणे येथील कारखानदार व्यावसायिक शंभूराज देवकाते यांच्यातील सुमारे पावणेपाच कोटी रुपये आर्थिक देवघेवीच्या वादातून मोठा गदारोळ झाला आहे. या रकमेच्या बदल्यात कारिवडेकर यांनी त्यांची आलिशान पोर्शे कार देवकाते यांना देण्याचे मान्य केले होते. ​कार आणि आरसी बुकचा ताबा घेण्यासाठी शंभूराज देवकाते त्यांच्या अन्य चार साथीदारांसह सावंतवाडीत आले होते. सुरुवातीला कारिवडेकरचा सुपरवायझर नितीन मेस्त्री याने ताबा देण्यास टाळाटाळ केल्याने वाद झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवारी मध्यरात्री कारिवडेकर यांच्या बंगल्यातून मेस्त्री आणि पुणे येथील पाच जण बाहेर आले असता, मुख्य संशयित सागर कारिवडेकर याने पाठवलेल्या अन्य पाच जणांनी त्यांना शिवीगाळ, धमकी, दगडफेक आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी शौनक सकपाळ (पुण्यातील) यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. जखमी सकपाळ यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ​या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी सुरुवातीला नितीन मेस्त्रीसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता.कोठडीतील संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व राडा सागर कारिवडेकरच्याच सांगण्यावरून घडल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी संशयित सागर कारिवडेकर याच्यावरही खुनाच्या प्रयत्नाचा (जीवे ठार मारण्याचा प्रयत्न) गुन्हा दाखल करून त्याला आरोपी केले आहे.

टाइम्स स्पेशल

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या नितीन मेस्त्रीसह चार जणांना फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यासाठी न्यायालयाने एक दिवसाची(२९ ऑक्टोबर पर्यंत) वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. ​फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत, मात्र ते अद्याप हाती लागलेले नाहीत. ​दुसऱ्या गुन्ह्यात, मारहाण, अपहरण आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मेस्त्रीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार अटक झालेल्या पुण्यातील शंभूराज देवकाते, शौनक सकपाळ यांच्यासह पाचही जणांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. ​हे प्रकरण शेअर बाजारातील पैशांच्या वादातून आलेला एक थरारक आणि गंभीर गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg