loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचे राफेल मधून उड्डाण, अंबालाच्या आकाशात भारताचा गौरव

नवी दिल्ली- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी बुधवारी सकाळी हरियाणाच्या अंबाला एअरफोर्स स्टेशन येथून राफेल फायटर विमानातून उड्डाण केले. यावेळी एअर चिफ मार्शल ए.पी.सिंह यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. त्यांनी केलेले उड्डाण हे साहसी नेतृत्वाचे प्रतिक आहे. भारताची वाढती रक्षकक्षमता आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प जगाच्यासमोर या निमित्ताने आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वी ८ एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रपती मूर्मू यांनी आसामच्या तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून सुखोयी-३० एमकेआय फायटर विमानातून उड्डाण केले होते. यासोबतच त्यांनी फायटर जेटने उड्डाण करणार्‍या तिसर्‍या राष्ट्रपती आणि दुसर्‍या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांंनी सुखोयी -३० एमकेआय फायटर विमानाने उड्डाण केले होते.

टाइम्स स्पेशल

फ्रान्सीसी एअरोस्पेस प्रमुख डसॉल्ट एविऐशनद्वारा निर्मित राफेल फायटर जेटचा औपचारिकरित्या सप्टेंबर २०२० मध्ये अंबाला एअरफोर्स स्टेशनमध्ये भारतीय वायूसेनेत समावेश करण्यात आला. फ्रान्सकडून २७ जुलै २०२० रोजी आलेल्या ५ राफेल विमानांना १७ स्कॉड्रन, गोल्डन एरोजमध्ये सामील केले गेले. हे जेट वायूसेनेच्या शक्तीचा महत्वपूर्ण भाग आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg