loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग किल्ल्याचा देखावा ठरला आकर्षण

मालवण (प्रतिनिधी) - मालवणी मुलखात दीपावलीच्या काळात वाळूचे गड किल्ले बनविणे हा बच्चे मंडळींचा एक छंद बनला आहे या छंदातूनच बच्चे कंपनी ही वाळूचे किल्ले बनवून आपली कला दाखवीत असतात. मालवण तालुक्यातील सुकळवाड पाताडेवाडी येथील कार्तिक अनिल पाताडे व नूतन अनिल पाताडे या भाऊ बहिणीने तसेच दीपराज दीपक जाधव या मुलांनी एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त किल्ल्याचा देखावा साकारात परंपरा जोपासली आहे. यावर्षी त्यांनी साकारलेला सिंधुदुर्ग किल्ल्याचा देखावा सर्वांचे आकर्षण ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्तिक पाताडे आणि नूतन पाताडे यांनी सलग पाचव्या वर्षी किल्ला देखावा साकारला आहे. यासाठी त्यांना दीपराज दीपक जाधव या मुलाचेही तसेच घरातल्या सदस्यांचेही सहकार्य लाभले. चार दिवसांच्या मेहनतीमधून त्यांनी ६ फूट रुंद व ९ फूट लांब एवढ्या आकाराचा सिंधुदुर्ग किल्ल्याचा देखावा साकारला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यातील सर्व गोष्टी बारकाईने दाखविण्यात आल्याने हा देखावा आकर्षण ठरत आहे. शिवरायांचे गडकिल्ले हे दुर्लक्षित होत असून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी देखावे साकारत असल्याचे पाताडे यांनी सांगितले. आता पर्यंत त्यांनी राजगड, सिंहगड, विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ल्याचे देखावे साकारले असून पाताडेवाडीत दरवर्षी आयोजित होणाऱ्या किल्ले बांधणी स्पर्धेत त्यांनी चार वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंग यांनी राबवलेल्या राजस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला असून गिर्यारोहण महासंघाचे प्रवीण कदम यांनी सुकळवाड येथे येऊन या किल्ला देखाव्याची पाहणी करत कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg