loader
Breaking News
Breaking News
Foto

युवा नेतृत्व पंकज वर्दम यांची शिवसेनेच्या (शिंदे गट) मालवण तालुका संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

मालवण (प्रतिनिधी) - शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये पोईप येथील युवा नेतृत्व पंकज गणेश वर्दम यांची शिवसेनेच्या मालवण तालुका संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उबाठा शिवसेनेला अलीकडच्या काळात एका मागोमाग एक धक्का देत उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर आज शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या विविध पदाधिकार्‍यांची नेमणूक केली. यामध्ये मालोंड बेलाचीवाडी येथील इस्माईल महमूद शेख यांची मसुरे जि. प. अल्पसंख्यांक विभागप्रमुख, अतुल आनंद तांबे यांची असगणी शाखाप्रमुख तर विनोद विष्णू भावे यांची किर्लोस शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी छोटू ठाकूर, सुधीर साळसकर, बाबू परब, शहर संघटक राजू बिडये, पंकज वर्दम, प्रशांत परब, बाळा राऊत, पोईपचे सरपंच शिवराम पालव, नारायण धुरी, भाऊ मोर्जे, पिंटो गावकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg