loader
Breaking News
Breaking News
Foto

महाड-विन्हेरे मार्गावर एसटी व कारची समोरासमोर धडक

संगलट( खेड )(इक्बाल जमादार) - महाड-विन्हेरे राज्य मार्गावर कुरले गटातील हॉटेल हिल टाऊनजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस (MH-06-AS-8483) आणि मारुती एस-एक्स-4 कार (MH-05-AX-3431) यांच्यात समोरासमोर धडक झाली. दापोलीकडून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने अपघाताचा मोठा आवाज परिसरात घुमला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून मोठी जीवितहानी टळली आहे. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

टाइम्स स्पेशल

गेल्या मे महिन्यापासून महाड-विन्हेरे मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून, ऑक्टोबर महिना संपत आला तरी या मार्गावरील अपघातांना आळा बसलेला नाही. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गाची सुरक्षितता आणि वाहतूक नियोजनाबाबत स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg