loader
Breaking News
Breaking News
Foto

नार्को को-ओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक

रत्नागिरी : अंमली पदार्थांच्या विरोधात शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची बैठक घेऊन प्रचार, प्रसिध्दी करावी. अंमली पदार्थ दुष्परिणामाबाबत माहितीपट प्रदर्शित करावा. ज्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तडीपारीच्या केसेस प्रलंबित आहेत, त्यांनी त्या तात्काळ मार्गी लावाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उत्पादन शुल्क अधिक्षक कीर्ती शेडगे, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी विभागनिहाय तसेच उपविभागानुसार सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, शिक्षण विभागाने शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तसेच पोलीस उपअधिक्षक कार्यालयाकडे प्रलं‍बित असणारे तडीपारीचे प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लावावेत. सर्व विभागांनी गंभीरपणे अंमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेवून, सतर्क राहून कारवाई करावी. विशेषत: सागरी मार्गावर अधिक लक्ष केंद्रित करावे.

टाइम्स स्पेशल

पोलीस अधीक्षक श्री. बगाटे म्हणाले, जंगल भागात गांजाचे पीक घेण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने त्याबाबत तपासणी करावी. पोलीस, कस्टम, उत्पादन शुल्क, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, एमआयडीसी अधिकारी या सर्वांनी अंमली पदार्थ विक्री पेडलर, निर्मिती करणारे कारखाने याबाबत सतर्क राहून तपासणी करावी, संयुक्तपणे कारवाई करावी. नशामुक्त भारत करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी नियोजन करुन कारवाई करावी. क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

तडीपारीच्या केसेस तात्काळ मार्गी लावा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg