loader
Breaking News
Breaking News
Foto

मडुरा येथे कृषी व महसूल विभागातर्फे भातनुकसानीचे पंचनामे

बांदा (प्रतिनिधी) - मडूरा पंचक्रोशीतील गावांमध्ये गेले पंधरा दिवस मुसळधार पाऊस होत असल्याने कापणी योग्य झालेले परिपक्व भातपीक कुजून गेले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार आज कृषी विभागाने व महसूल विभागाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे काम हाती घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मडूरा पंचक्रोशीत गेले पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. शिवाय गेले तीन आठवडे ओंकार हत्तीने गावात तळ ठोकल्याने भात कापणी करण्यास शेतकरी धजावत नव्हते. त्यामुळे कापणी योग्य परिपक्व झालेल्या भात पिकाची अतोनात नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांचे अपरिमित असे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, कास सरपंच प्रवीण पंडित, मडूरा माजी उपसरपंच उल्हास परब, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सोमवारी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कथन केले व नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत व संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती.

टाइम्स स्पेशल

त्यानुसार तहसीलदार श्रीधर पाटील यांनी महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. आज मंगळवारी सकाळीच मडूरा तलाठी एन. आर. नाईक, कृषी पर्यवेक्षक अजमुद्दीन सद्गुरु, कृषी सहाय्यक वैभव ननावरे, पल्लवी सावंत यांनी शेतीची पाहणी केली व पंचनामे करण्याचे काम हाती घेतले. नुकसानग्रस्त संबंधित शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg