loader
Breaking News
Breaking News
Foto

क्रिकेट विश्वातील 'लिटल मास्टर' सुनील गावस्कर यांनी घेतले रेडी येथील श्री नवदुर्गा मातेचे दर्शन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि भारतीय क्रिकेटमधील महान व प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, 'लिटल मास्टर' सुनील गावस्कर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी कनयाळ येथील श्री नवदुर्गा माता मंदिर मध्ये देव दर्शन घेतले. यावेळी भारताचे महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्यासह सौभाग्यवती तसेच गुंडप्पा विश्वनाथ यांनी आपल्या कुटुंबीयांसह हजेरी लावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावसकर आणि विश्वनाथ कुटुंबानं मनोभावे देवीची पूजा केली व भक्ती प्रकट केली. ​या दर्शनानंतर त्यांनी महाप्रसादाचा आस्वादही घेतला. ​आपल्या व्यस्त वेळापत्रकातून जेव्हाही वेळ मिळतो, तेव्हा आपण आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक होत असल्याचे सुनील गावस्कर यांनी यावेळी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg