loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड आगारातील बसफेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले, खारीपट्ट्यातील संगलट, बहीरोली मार्गावर चांगलाच फटका

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - "ऐन दीपावली सुट्टीच्या हंगामात खेड बसस्थानकातून सुटणाऱ्या बसफेऱ्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. पंढरपूर यात्रेसाठी बसफेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. यामुळे आगारातून सुटणाऱ्या ४० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नेहमी संगलट मार्गावरील 7.15 ची व साडेनऊची खेड संगलट गाड्या बंद करण्यात येत असतात त्यामुळे ह्या गाड्यावर अवलंबून असलेले विद्यार्थी, कामगार, आजारी रुग्ण या गाडीचा फायदा घेत असतात. मात्र खेड आगारातून वारंवार बंद करण्यात येत असल्याने प्रवाशांतून संतापाची लाट पसरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथील बसस्थानकातून २२ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत ग्रामीण भागात मार्गस्थ होणाऱ्या तब्बल ४० बस रद्द केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रद्द बसफेऱ्यांच्या बदल्यात अन्य बसफेऱ्यांची व्यवस्था न केल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. पंढरपूरसाठी ३४ बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. या बसेस २८ ऑक्टोबरपासून पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत. यामुळे आगारात बसेसची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. दीपावली सुट्टीचा हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. यामुळे प्रवाशांची इच्छितस्थळ गाठण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र आगारातील बसफेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने बस नेमकी कधी सुटणार याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना स्थानकातच तासन्तास तिष्ठत बसावे लागत आहे.

टाइम्स स्पेशल

ही परिस्थिती ४ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणारे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg