loader
Breaking News
Breaking News
Foto

आम्ही सत्तेत नाही म्हणून समोरची काही मंडळी आमची लोक चोरून नेत आहेत - आम. भास्कर जाधव यांची खंत

राज्यातील निवडणुका 31 जानेवारी च्या आत घ्या असे आदेश कोर्टाने दिल्यानंतर राज्यातील सर्वच नेते निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव गेले 4 दिवस विधासभा मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.आज गुहागर शासकीय विश्रामगृह येथे गुहागर मधील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत असताना भास्कर जाधव यांनी एक खंत बोलून दाखवली आपण सत्तेत नाही म्हणून समोरची काही मंडळी आमचे लोक चोरून नेत आहेत त्यामुळे आम्हाला वाटलं होत की, आम्हाला उमेदवारांची वाणवा भासेल पण तसं झालं नाही उलट लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये चीड आहे आणि हे जे काही राज्यकर्ते वागत आहेत हे लोकांना अजिबात मान्य नाही त्यामुळे आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार आहेत. त्याचबरोबर गुहागर नगरपंचायतीचे सुद्धा 17 वार्ड आणि एक नगराध्यक्ष असे 18 उमेदवार आम्हाला ठरवायचे होते त्यांचे सुद्धा आज मुलाखती आम्ही घेतल्या आहेत आणि त्यांची नावे लवकरच आम्ही जाहीर करू अशी माहिती शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून आपण कोणाला उमेदवारी दिलीत. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना आम. भास्कर जाधव म्हणाले की, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून सिद्धी संतोष रामगडे ही अतिशय उच्चशिक्षित मुलगी ग्रॅज्युएट झालेली आहे. त्याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केलेला आहे. तिने अनेक कोर्स केलेले आहेत आणि स्वतः ती व्यावसायिक आहे आणि विशेष करून ती कुणबी समाजातील आहे. अशी उमेदवार आम्ही जाहीर केले आहे. या मुलींन उभी राहून अशी म्हणाली की, निवडणुकीला मी तयार आहे. तेव्हा उपस्थित सर्वांनी प्रचंड जल्लोष केला. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तो आता जिंकून आलीस म्हणून लोकांनी तिचा हार तुरे देऊन सत्कारही केला. असगोली जिल्हा परिषद गटातून विक्रांत दादांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे याबद्दल बोलताना आम. भास्कर जाधव म्हणाले की, आरक्षणाचे लॉट पडणार होते रिझर्वेशन ठरणार होतं त्याच वेळेला मी विक्रमला विचारलं तू कुठून उभा राहणार मागच्या वेळेला हावर्ड ओपन पडला आता जिथून तो उभा राहतोय अंजनवेल गटातून तिथे.त्यामुळे तू चिपळूणला गटातून उभा राहा, तू कळंबट गटातून उभा रहा. नाहीतर मी दोन-तीन गटात मी तयारी केली होती. परंतु त्यांनी मला स्पष्ट सांगितले पप्पा मला जर संधी मिळाली तर माझ्या गटातून सीट ओपन पडली तर मी तिथून निवडणूक लढवेल नपेक्षा ज्याच्या कोणाच्या गटामध्ये ती पडेल ती पडेल त्याचं मी काम करेन. आणि शेवटी पक्षाचा एक माणूस वाढावा ही माझी इच्छा आहे. परंतु त्यांचा हा प्रामाणिकपणा मला वाटतं देवानं ऐकला. मागच्या वेळेला सुद्धा ती ओपनची शीट पडली होती. मध्ये रिझर्वेशन पडलं तेव्हा ओपन पडली होती आणि आता पुन्हा रिझर्वेशन पडलं त्या वेळेला ती ओपन सीट पडली त्यामुळे विक्रांत तिथून उभा राहणार असे आम. भास्कर जाधव यांनी जाहीर केले.

टाइम्स स्पेशल

तीन जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती गट आपण उमेदवार कधी घोषित करणार आहात या प्रश्नाला उत्तर देताना आम. भास्कर जाधव पुढे म्हणाले की, आज सकाळी मनसेची मंडळी मला भेटायला आली होती. माझ्यासमोर जे विधानसभेचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले प्रमोद गांधी आणि त्यांचे सर्व सहकारी मला भेटायला आले होते. त्यांनी मला असा प्रस्ताव दिलाय की, आपण जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका एकत्रित लढू असा त्यांनी प्रस्ताव दिलाय, मला तो प्रस्ताव मान्य आहे. त्यांना मी म्हटलं की वास्तवाचं भान ठेवून आपण निर्णय घेऊया. वास्तव मागण्या आपण कोणी करूया नको. त्यांना ते मान्य आहे. आणि म्हणून त्यांच्याबरोबर आमची आघाडी ही नक्की होणार, युती ही नक्की होणार मुळे त्यांच्याबरोबर बसल्यावरच उर्वरित नावे मी घोषित करणार असा विश्वासही आम. भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

सेना - मनसे एकत्र निवडणूक लढवणार

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg