loader
Breaking News
Breaking News
Foto

आम. निकम यांनी देवरूख चोरपऱ्या ते मशिद यारस्त्यासह सिसिटिव्ही बसविणेसाठी ९८ लाख निधी केला मंजुर

देवरूख (सुरेश सप्रे) - जनतेला शब्द दिल्याप्रमाणे आमदार शेखर निकम यांनी नगर पंचायतीच्या ताब्यातील देवरूख चोरपऱ्या ते मशिद रस्ता दुरुस्तीसाठी ६५ लाखाचा निधी मंजूर करून घेतला आहे. देवरूख चोरप-या, बसस्थानक ते मशिद हा मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. यावर पडलेल्या प्रचंड खड्डयामुळे वाहन चालवणे व पायपीट करतात कसरत करावी लागत होती. प्रशासनाच्या बेफिकीर व भोंगळ कारभारामुळे जनतेला वेठीस धरले जात होते. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हनिफशेठ हरचिकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने २२ सप्टेंबर रोजी आम. शेखर निकम यांची घेतली होती. त्या वेळी आमदारांनी दिवाळीपूर्वी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला जाईल असा ठाम शब्द दिला होता—आणि तो शब्द पाळत त्यांनी या रस्त्यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फक्त रस्ताच नव्हे तर देवरूख शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रश्न सुद्धा आमदारांनी तातडीने सोडवला आहे. या उपक्रमासाठी .३३ लाखांचा निधीही त्यांनी मंजूर करून आणला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या कामांसाठी निधी “नागरी सेवा व सुविधा पुरविणे” या योजनेतून प्राप्त करण्यात आला आहे. यामुळे देवरूख शहराचा विकास आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींना नवे बळ मिळणार आहे. जनतेच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून, दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आमदार शेखर निकम यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. असे शहराध्यक्ष हरचिरकर यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

तसेच देवरूख, चिपळूण आणि संपूर्ण संगमेश्वर मतदारसंघातील उर्वरित प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे देवरूख, चिपळूण आणि संपूर्ण संगमेश्वर मतदारसंघातील उर्वरित प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg