loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसेने दिला प्रस्ताव, मला मान्य - आम. भास्कर शेठ जाधव

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत निवडणुका आपण शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे लढू या असा प्रस्ताव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यासमोर ठेवला आमदार भास्कर जाधव यांनी तात्काळ तो मान्यही केला आणि यापुढे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विधानसभेच्या वेळेला माझ्याविरुद्ध उभे असणारे प्रमोद गांधी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी माझी येऊन भेट घेतली आणि आपण पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुका एकत्रितपणे लढवू या असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला तो प्रस्ताव मला मान्य असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

आमदार जाधव यांनी पुढे असे सांगितले की मी त्यांना सांगितलं आहे की वास्तवाचं भान ठेवून आपण निर्णय घेऊ या. अवास्तव मागण्या नको करू या हा निर्णयही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मान्य आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर युती आणि आघाडी ही निश्चित होणार आहे. त्यांच्या समोर बसल्यानंतरच उर्वरित उमेदवारांची घोषणा केली जाईल असे आम. जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg